

रिक्षाचालकांविरोधात पनवेलमध्ये मोहीम
वाहतूक शाखा, आरटीओ यांच्या चार दिवसांत १,३२० कारवाया
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या रिक्षाचालकांसह अन्य वाहनचालकांविरोधात पनवेल शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम राबविली. ४ ते ८ सप्टेंबरदरम्यान वाहतूक शाखेने तब्बल १,३२० कारवाया करून नऊ लाख ५० हजार २५० रुपयांचा दंड आकारला, तर आरटीओकडून ४२ कारवाया करून तीन लाख ८४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मंगळवारी (ता. ८) सकाळी ७ ते ११.३० या वेळेत पनवेल शहरातील नवीन पनवेल रेल्वे स्थानक, एचडीएफसी, आदई सर्कल आणि माथेरान रोड परिसरात संयुक्त विशेष रिक्षा तपासणी मोहीम राबविण्यात आली. रिक्षामध्ये अनधिकृत फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, काळ्या काचा तसेच विना हेल्मेट वाहन चालविणे आदी नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अनिल गेळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रिक्षाचालकांनी गणवेश परिधान करून मीटरप्रमाणे भाडे आकारावे आणि प्रवाशांशी नम्रपणे वागावे, असे आवाहन करण्यात आले. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे आणि सिग्नलचे पालन करावे, तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, असेही वाहतूक शाखेने स्पष्ट केले.
१३.३४ लाखांचा दंड वसूल
४ ते ८ सप्टेंबरदरम्यान वाहतूक शाखा आणि आरटीओने केलेल्या एकूण १,३६२ कारवायांतून १३ लाख ३४ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.