सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
Published on

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागांत एरिया डॉमिनेशन; नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पनवेल शहर पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी शहरातील विविध संवेदनशील भागांतून रूट मार्च काढत एरिया डॉमिनेशन केले.
पनवेल शहर पोलिस ठाण्यापासून या रूट मार्चला सुरुवात झाली. ५२ बंगला, साईनगर, ख्वाजा नगरी मशीद, साई श्रद्धा मित्र मंडळ, बंदर रोड, ओंकारेश्वर महादेव मंदिर, आयशा मशीद, आदिल टॉवर, सुफा मशीद, एम.जी. रोड, कच्ची मोहल्ला, मुसलमान नाका, पाडा मोहल्ला मशीद, जलालशहा दर्गा, पनवेल महापालिका कार्यालय, जय भारत नाका, लाइन आळी, वीरुपक्ष मंदिर, आदर्श हॉटेल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रूट मार्चचा मार्ग होता.
या मोहिमेत पनवेल शहर पोलिस ठाण्याचे ७ अधिकारी व ३५ पोलिस अंमलदार, तसेच आरएएफ बी-१०२ चे एक उपकमांडर, एक सहाय्यक कमांडर, पाच निरीक्षक, आठ उपनिरीक्षक आणि १०१ अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांची दोन आणि आरएएफची तीन वाहनेही या रूट मार्चमध्ये सहभागी झाली.
सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे, संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढविणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता.
दरम्यान, सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावेत यासाठी पोलिसांकडून शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वपोनि बाळा कुंभार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com