नियमित वर्ग,बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही सक्तीची करण्याची मागणी..!!

नियमित वर्ग,बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही सक्तीची करण्याची मागणी..!!
Published on

नियमित वर्ग, बायोमेट्रिक हजेरी व सीसीटीव्ही सक्तीची करण्याची मागणी

मनविसेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

वाडा, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी व बारावीचे नियमित वर्ग भरविणे, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करणे, महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच केवळ बोर्ड परीक्षेसाठी नावापुरते प्रवेश देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी व बारावीचे नियमित वर्ग भरविले जात नाहीत. अनेक विद्यार्थी नीट, जेईई, एमएचटी सीईटी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतात, तर काही महाविद्यालये केवळ बोर्ड परीक्षेसाठी नावनोंदणी करून विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत. यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून नियमित महाविद्यालयात उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मनविसेने केला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची बोर्ड परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पालघर उपजिल्हाध्यक्ष निखिल बागुल, पालघर तालुकाध्यक्ष तन्मय संखे, उपतालुकाध्यक्ष चेतन गोरे, विभाग संघटक संकेत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com