

नेरूळमध्ये अतिक्रमण हटले; राडारोडा मात्र कायम!
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) : शहरात पालिकेने अतिक्रमणमुक्त मोहिम सुरू केली आहे. यानुसार नेरूळ एलपी परिसरातील बँक ऑफ बडोदा बँकेसमोरील सुमारे २० ते २५ अनधिकृत टपऱ्यांवर हटविण्यात आल्या आहेत, मात्र येथील राडारोडा प्रशासनाने उचललेला नसल्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून, स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. महापालिकेने राडारोडा हटवून सर्वसमावेशक ओपन जिम किंवा हरित पट्टा विकसित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
नेरूळ एलपी परिसरात बँक ऑफ बडोदा बँकेसमोरील जागेवर मोठ्या प्रमाणात टपऱ्या, गॅरेजसह विविध खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे व्यवसाय सुरु होते. या अनधिकृत व्यवसायांवर पालिका प्रशासनाने बुलडोझर चालविला आहे. यामुळे अनधिकृत टपऱ्यांचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला असला, तरी त्यानंतर निर्माण झालेला राडारोड्यामुळे अस्वच्छता पसरली असून, डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या भूखंडाच्या मागील बाजूस तसेच शेजारी सिडको आणि खासगी विकसकांनी उभारलेल्या निवासी इमारती असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी ओपन जिम, छोटेखानी उद्यान किंवा हरित पट्टा विकसित केल्यास परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने राडारोडा हटवून या जागेचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
अतिक्रमण हटविल्यानंतर केवळ कारवाई करून प्रशासनाने थांबू नये, तर तेथील राडारोडा तातडीने उचलून परिसर स्वच्छ करणे आवश्यक आहे. या ठिकाणी १५ दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली आहे, मात्र येथील कचरा अद्याप न उचलल्याने येथील शिरवणे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी महापालिकेने त्वरित कचरा उचलावा अन्यथा आम्हा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल.
- दिपेश पाटील, ग्रामस्थ, शिरवणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.