

साईनगर येथे साकारतेय मनमोहक ‘बटरफ्लाय गार्डन’
महापौर नितीन पाटील यांच्याकडून उद्यानाच्या कामाची पाहणी; जैवविविधता संवर्धनाला मिळणार चालना
पनवेल, ता. ९ (प्रतिनिधी) : पालिकेच्या वतीने साईनगर येथे उभारण्यात येत असलेल्या आकर्षक ‘बटरफ्लाय गार्डन’च्या कामाला वेग आला आहे. महापौर नितीन पाटील आणि परेश ठाकूर यांनी संयुक्तपणे या उद्यानाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. या प्रकल्पामुळे परिसरातील सौंदर्यात भर पडण्यासोबतच जैवविविधता संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
साईनगर परिसरात उभारण्यात येणारे हे बटरफ्लाय गार्डन नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. उद्यानामध्ये फुलपाखरांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याबरोबरच विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे आणि नैसर्गिक घटकांचा समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे फुलपाखरांसह विविध पक्षी व कीटकांना अनुकूल अधिवास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पाहणीदरम्यान उद्यानातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. कामाची गुणवत्ता, परिसराचे सुशोभीकरण तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. उद्यानाची निर्मिती करताना पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. या वेळी प्रभाग समिती ‘ड’चे सभापती अजय बहिरा,नगरसेवक सुमित झुंजारराव, रोटेरियन डॉ. गिरीश गुणे , रोटरी क्लबचे सदस्य तसेच पनवेल महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.