नवी मुंबईत ‘अंगण दत्तक योजना;

नवी मुंबईत ‘अंगण दत्तक योजना;
Published on

नवी मुंबईत ‘अंगण दत्तक योजना’
सार्वजनिक जागा, चौक, रस्ते सुशोभीकरणासाठी जनसहभागाला प्रोत्साहन
जुईनगर, ता. ९ (बातमीदार) ः शहराच्या सौंदर्यात आणि स्वच्छतेत भर घालण्यासाठी सुगंधी शहर अभियानाचा पुढील टप्पा म्हणून ‘अंगण दत्तक योजना २०२६’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक आणि दुर्लक्षित जागा दत्तक घेऊन त्यांचे सुशोभीकरण व देखभाल करण्यासाठी नागरिकांना सहभागी करून घेणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपमहापौर दशरथ भगत यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून या योजनेचे उद्‍घाटन शनिवार (ता. १२) वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे. ‘खारीचा वाटा, आनंद मोठा’ या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. केवळ महापालिका प्रशासनावर अवलंबून न राहता शहरातील नागरिक, संस्था, सामाजिक संघटना, व्यावसायिक तसेच विविध आस्थापनांनी पुढाकार घेत सार्वजनिक जागांची जबाबदारी स्वीकारावी, अशी संकल्पना या योजनेमागे आहे. शहराच्या सौंदर्य आणि स्वच्छतेसाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेणाऱ्या नागरिकांचा आणि संस्थांचाही या वेळी गौरव करण्यात येणार आहे. दरम्यान, अभियानाच्या कामकाजात पारदर्शकता राहावी तसेच योजनेच्या दैनंदिन प्रगतीची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष संकेतस्थळाचे लोकार्पणही कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com