

डोंबिवली, ता. १० : पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ संस्थेच्या उपाध्यक्षा तथा पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका अरुणा जाधव यांच्या अभिनव संकल्पनेतून विद्यालयात मंगळागौरीचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. डोंबिवली येथील सानवी ग्रुपच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
ग्रुपमधील महिलांनी विविध पारंपरिक खेळ, उपक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणातून समृद्ध महाराष्ट्रीय संस्कृतीची मनोहारी झलक उपस्थितांसमोर सादर केली. लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांची माहिती देतानाच त्यांचे महत्त्वही विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमातून एकीचे बळ, शिस्त, संयम, कौशल्य, संघभावना आणि वेळेचे नियोजन या गुणांचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले. अवघ्या दोन तासांत नियोजनबद्ध पद्धतीने मनोरंजक आणि शिस्तबद्ध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता येतो, याचे उत्तम उदाहरण ग्रुपच्या महिलांनी घालून दिले. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस, उपमुख्याध्यापक आर. एस. शिंदे, माजी शिक्षिका पाटील तसेच सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक संस्कृतीचे जतन करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.