श्रीवर्धनात सीएनजी पंपाचा अभाव

श्रीवर्धनात सीएनजी पंपाचा अभाव
Published on

श्रीवर्धनात सीएनजी पंपाचा अभाव
पर्यटनस्थळ असूनही वाहनचालकांची गैरसोय
श्रीवर्धन, ता. ९ (वार्ताहर) : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणून श्रीवर्धनची ओळख असली, तरी शहरात अद्याप सीएनजी पंपाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. केंद्र सरकारकडून प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन बचतीसाठी सीएनजी वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असताना श्रीवर्धनसारख्या पर्यटनस्थळी ही सुविधा नसल्याने स्थानिक वाहनधारकांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
श्रीवर्धन परिसरात विविध विकासकामे सुरू असतानाही वाहनधारकांसाठी आवश्यक असलेला सीएनजी पंपाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे हे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे श्रीवर्धनसारख्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळी सीएनजी पंपाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी ठोस प्रयत्न होणे अपेक्षित असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक नागरिकांनी सीएनजी वाहनांना पसंती दिली आहे. तसेच सुट्टीच्या काळात श्रीवर्धन परिसरातील समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी शेकडो पर्यटक स्वतःच्या वाहनांनी येतात, मात्र सीएनजी भरण्यासाठी शहराबाहेर जावे लागत असल्याने वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च होत आहे. शासन व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन श्रीवर्धन शहरात सीएनजी पंपाला मंजुरी देऊन तो लवकरात लवकर कार्यान्वित करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com