उतेकर कुटुंबाला वृत्तपत्र विक्रेता संघाचा मदतीचा हात

उतेकर कुटुंबाला वृत्तपत्र विक्रेता संघाचा मदतीचा हात
Published on

उतेकर कुटुंबाला वृत्तपत्र विक्रेता संघाचा मदतीचा हात
उपचारासाठी ३० हजारांची तातडीची मदत

मुंबई, ता. ९ ः कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष अजय उतेकर यांचे बंधू विजय उतेकर यांना काही दिवसांपूर्वी मेंदूत रक्तस्राव आणि पक्षघाताचा तीव्र धक्का बसल्यामुळे कुर्ला येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अत्यंत नाजूक व कठीण परिस्थितीत त्यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया पार पडली असून, उपचाराचा एकूण खर्च तब्बल १५ लाख रुपयांच्या आसपास गेला आहे.
उतेकर कुटुंबावरील या अचानक आलेल्या मोठ्या आर्थिक संकटात त्यांचे मित्रमंडळी आणि आप्तेष्ट मदतीसाठी पुढे आले आहेत. याच सामाजिक जाणिवेतून व सहकार्याच्या भूमिकेतून कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने अजय उतेकर यांच्याकडे पुढील उपचारासाठी ३०,००० रुपये रोख रकमेची तातडीची मदत सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी संघाचे प्रतिनिधी सुनील म्हापणकर यांनी मदतीचे आवाहन केले. ते म्हणाले, विजय उतेकर यांच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. वेळ अजून गेलेली नाही, त्यामुळे सर्वांनी उतेकर कुटुंबाला शक्य ती आर्थिक मदत सुरू ठेवावी. कुर्ला वृत्तपत्र विक्रेता संघ या कठीण काळात अजय उतेकर आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com