वाशी फळ बाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन

वाशी फळ बाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन
Published on

फळ बाजारात स्ट्रॉबेरीचे आगमन
बॉक्सचा दर ९०० रुपये

वाशी, ता. ९ (बातमीदार) ः एपीएमसीच्या फळ बाजारात महाबळेश्वरहून यंदाच्या हंगामातील पहिली स्ट्रॉबेरी दाखल झाली आहे. अवकाळी पावसामुळे यंदा स्ट्रॉबेरी बाजारात लवकर आली असली तरी सुरुवातीच्या टप्प्यात आवक मर्यादित असल्यामुळे एका बॉक्सचा दर ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सध्या स्ट्रॉबेरीची चव ग्राहकांच्या खिशाला महाग पडणार आहे.
स्ट्रॉबेरी हे हंगामी फळ असून, थंडीच्या काळात त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सुरुवातीच्या टप्प्यात बाजारात आवक मर्यादित असल्याने भाव तुलनेने जास्त आहेत. आवक वाढल्यानंतर भावात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
स्ट्रॉबेरीच्या आगमनामुळे फळ बाजारात हंगामी फळांची रेलचेल सुरू झाली असून, येत्या काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या भावातही बदल होण्याची शक्यता असून ग्राहकांना आगामी काळात तुलनेने कमी भावात स्ट्रॉबेरी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

पहिल्या पेटीचे पूजन
विकास रतन पानसरे आणि राजेंद्र कोकणे यांच्या गाळ्यात स्ट्रॉबेरीच्या आगमनानिमित्त पूजन करण्यात आले. यामुळे फळ बाजारात हंगामी फळांच्या आवकेला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा स्ट्रॉबेरी ही बाजारात लवकर दाखल झाली असल्याचे व्यापारी विकास पानसरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com