

महेंद्र घरत जनतेच्या गळ्यातील ताईत
काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : उरण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त शेलघर येथे आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. महेंद्र घरत हे जनतेच्या गळ्यातील ताईत असून, त्यांना पक्षात योग्य संधी देणे ही माझी नैतिक जबाबदारी असल्याचा शब्द प्रांताध्यक्षांनी या वेळी दिला.
रायगड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाला देत हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, की जिल्ह्यात वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला (शेकाप) यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शून्यावर यावे लागले. याउलट काँग्रेसने घवघवीत यश मिळवले, त्यामागे महेंद्र यांची दूरदृष्टी आणि रणनीती कारणीभूत ठरली. याच वेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल करीत ते म्हणाले, की खोटं बोला पण रेटून बोला, हीच भाजपची मनोवृत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उठसूठ खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत आहेत. या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी येत्या काळात काँग्रेसची पाळेमुळे तळागाळात अधिक घट्ट रोवण्याची गरज आहे.
आपल्या मनोगतात महेंद्र घरत यांनी कार्यकर्त्यांशी असलेले नाते अधोरेखित केले. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे. दुसऱ्याला संधी देण्यासाठी दोन पावले मागे येण्याची विनोद म्हात्रे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.