विद्यार्थ्यांना वृत्तपत्र छपाईचे धडे

विद्यार्थ्यांना वृत्तपत्र छपाईचे धडे
Published on

अंबरनाथ, ता. १० : पंचकोशारित गुरुकुल विद्यालय, अंबरनाथ येथील आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘सकाळ एनआयई’ उपक्रमांतर्गत तळोजा येथील ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या मुद्रणालयाला क्षेत्रभेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राची छपाई प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेतली.
गुरुकुल प्रमुख आश्वनी करजगी, व्यवस्थापक विवेक पाटील, शिक्षिका विजया पाटील व मधुकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रभेट झाली. या वेळी सीटीपी विभागाचे चिंचाळकर आणि रंग विभागाचे रमेश गवळी यांनी विद्यार्थ्यांना मुद्रण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. वर्तमानपत्राची छपाई कशी होते, केवळ चार मूलभूत रंगांच्या मिश्रणातून विविध रंगांची छपाई कशी केली जाते, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर अंकांची छपाई कशी केली जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारले. ‘सकाळ’ची सुरुवात कधी झाली, कागदाच्या एका रोलमधून किती अंक छापले जातात, बातम्या कुठून मिळतात, छपाईची यंत्रणा कशी असते, तसेच अंक गावागावात कसे पोहोचवले जातात, अशा अनेक प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी भडिमार केला. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन केले.
वितरण विभागातील सुरेश ठाकूर यांनी वर्तमानपत्र विविध ठिकाणी पोहोचवण्याची पद्धत, वितरण यंत्रणा तसेच ‘सकाळ एनआयई’ अंक व त्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळाली. नवीन माहिती जाणून घेताना विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com