पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करताना श्रीमूर्ती विसर्जनासाठी १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
Published on

श्रीमूर्ती विसर्जनासाठी १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती
नेरूळ, ता. १० (बातमीदार) ः नवी मुंबई पालिकेच्या वतीने यंदाचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि प्लॅस्टिकमुक्त साजरा करण्याचे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक जलस्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पालिकेने शहरात तब्बल १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे.
नागरिकांनी पर्यावरणाची जपणूक करण्याच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची प्रतिष्ठापना न करता पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. तसेच श्रीमूर्तींचे विसर्जन नैसर्गिंक जलस्रोतात न करता कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. यामध्ये बेलापूर विभागात २२, नेरूळ विभागात २९, वाशी विभागात १६, तुर्भे विभागात २१, कोपरखैरणे विभागात १६, घणसोली विभागात १६, ऐरोली विभागात २५ व दिघा विभागात १४ गावांसह २५ अशाप्रकारे एकूण १७० कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जात आहेत.

मोफत ऑनलाइन परवानग्या
श्रीगणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आलेले नसून मंडप परवानगीसाठी एक खिडकी स्वरूपात संगणकीय ऑनलाइन ई-सेवा उपलब्ध करून दिल्याने मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com