

‘माझ्या शाळेची हाक’मधून मराठी शाळेचा प्रवास
अमर कोर विद्यालयात गुणवंतांचा गौरव
मुंबई, ता. १० ः अमर कोर विद्यालय, भांडुप प्रस्तुत ‘माझ्या शाळेची हाक - विश्वासाची, अभिमानाची’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमासह शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील वार्षिक पारितोषिक वितरण व गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड येथे दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मारुती म्हात्रे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण म्हात्रे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद, पत्रकार वैभव वझे, उद्योगपती जयंत देशपांडे, बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के-सामंत, सेवानिवृत्त शिक्षक लुईस डिमेलो, फ्रान्सिस डिमेलो, सिल्वेस्टर लोपीस आदी उपस्थित होते.
शिशु वर्गापासून नववीपर्यंत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर चौथी, पाचवी, सातवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षेत यश संपादन करणाऱ्या तब्बल १२१ विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.
दहावीमध्ये शाळेत प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा आणि विषयात प्रथम व इयत्तेत प्रथम येऊन शाळेचा नावलौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक प्रमोद महाडीक यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला मराठी शाळेच्या वास्तव प्रवासाची कलाकृती ‘माझ्या शाळेची हाक – विश्वासाची, अभिमानाची’ या विषयावर आधारित सांस्कृतिक सादरीकरण कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. सोहळ्यास संस्थेचे सेक्रेटरी जीवन म्हात्रे यांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापक साईनाथ हांडे, अजय पवार, पर्यवेक्षिका संगीता मोरे यांचे विशेष योगदान लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या शाळेचे संचालक मारुती म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.