

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्काउट-गाइडच्या गणवेशासाठी आता महापालिकेकडून थेट आर्थिक मदत मिळणार आहे. पाचवी ते सातवीतील पाच हजार ३०० विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने गणवेश खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणवेश आणि स्काउट-गाइड उपक्रमासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी महापालिकेच्या तिजोरीवर ५४ लाख ३० हजारांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय व वित्तीय मंजुरी मिळविण्यासाठी तो महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
महापालिकेने वस्तुरूपात गणवेश देण्याऐवजी विद्यार्थ्यांना थेट आर्थिक लाभ देण्याची पद्धत स्वीकारली आहे. त्यानुसार विद्यार्थी गणवेश खरेदी करून त्याची पावती शिक्षण विभागाकडे सादर करतील. त्यानंतर निश्चित अनुदानाची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी गणवेशाचे दर निश्चित करण्यासाठी महापालिकेने दरपत्रके मागविली होती. त्यामध्ये विधी ट्रेडिंग कंपनीचे दर सर्वांत कमी आढळल्याने त्यानुसार खर्च निश्चित करण्यात आला आहे.
स्काउट आणि गाइडच्या प्रत्येकी दोन हजार ६५० विद्यार्थ्यांना दोन हजार ५९९ रुपये दराने अनुदान मिळणार आहे. त्यामुळे गणवेशासाठी ५१ लाख ९८ हजार रुपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील. गणवेशासोबतच स्काउट-गाइड उपक्रमांसाठी सात कॅम्पिंग तंबू, बीएसजी स्काउट ध्वज, पांढरी दोरी, ५० मीटरचे साहस रोप आणि साहित्य ठेवण्यासाठी पेट्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी दोन लाख ३२ हजार ९७४ रुपये खर्च अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.