क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा प्रस्ताव तयार करावा

क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा 
प्रस्ताव तयार करावा
Published on

क्रीडा सवलतीचे गुण देण्याचा
प्रस्ताव तयार करावा
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश
मुंबई, ता. १० : शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव तातडीने तयार करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
शालेय क्रीडा प्रकारातील ४४ खेळांना क्रीडा गुणांची सवलत देण्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते.
विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, खेळांमुळे शालेय विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याबरोबरच सुदृढ आणि निरोगी राष्ट्रनिर्मितीस हातभार लागतो. राज्यातील विविध शाळा शासनाच्या आर्थिक मदतीशिवाय अनेक क्रीडा प्रकार आणि स्पर्धांचे आयोजन करतात. या क्रीडा प्रकारांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची योग्य दखल घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय गुणांकनात क्रीडा सवलतीचे गुण देण्याबाबत संबंधित विभागांनी सकारात्मक कार्यवाही करावी. महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेच्या मागणीनुसार, विनाअनुदानित ४४ क्रीडा प्रकारांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीतील चार लाखांहून अधिक विद्यार्थी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळावा तसेच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी क्रीडा सवलतीचे गुण देण्याची मागणी संस्थेने केली आहे.
बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रूपाली सावंत, क्रीडा संचालनालयाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी कुणाल सरपाते, शालेय शिक्षण विभागाचे सहायक कक्ष अधिकारी दारासिंग दुल्हत, महाराष्ट्र राज्य शालेय खेळ क्रीडा संस्थेचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले, विविध विनाअनुदानित शालेय खेळांचे प्रशिक्षक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com