परिवहन सदस्य राजेश राय यांच्या मागणीला यश

परिवहन सदस्य राजेश राय यांच्या मागणीला यश
Published on

परिवहन सदस्य राजेश राय यांच्या मागणीला यश


नेरूळ, ता. १६ (बातमीदार) ः सानपाडा विभागातील प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी नवीन बस शेल्टर उभारण्याची मागणी नवी मुंबई महापालिका परिवहन समितीचे सदस्य राजेश राय यांनी केली होती. त्यांच्या मागणीला अखेर यश आले असून, परिवहन उपक्रमांकडून बस शेल्टर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. परिवहन सदस्य राजेश राय यांनी परिवहन समितीच्या पहिल्या बैठकीपासूनच सानपाडा विभागातील बस थांबे तसेच शेल्टर उभारणे याबाबत आवाज उठवला होता. तसेच सानपाडा विभागातील बस थांब्यांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली होती. स्वामी विवेकानंद स्कूल येथे २, नथू जोमा चौक येथे २ आणि अनिरुद्ध भवन येथे १, अशा एकूण पाच बस शेल्टरची उभारणी करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने २० ऑगस्ट २०२६ रोजी परिवहन उपक्रमाच्या प्रतिनिधीन सह संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणानंतर संबंधित कामाची पूर्तता करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. परिवहन उपक्रमांनी दिलेल्या माहितीनुसार, नथू जोमा चौक येथे एक नवीन बस शेल्टर उभारण्यात आले असून, उर्वरित ठिकाणीही ब शेल्टर उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे. नवीन बस शेल्टरमुळे सानपाडा परिसरातील प्रवाशांना उन्हा पावसापासून संरक्षण मिळण्यासोबतच बसची प्रतीक्षा करताना मोठी सोय होणार आहे. राजेश राय यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी मार्गी लागल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com