गणेशोत्सवाच्या तोंडावर पुरोहित मिळेना

गणेशोत्सवाच्या तोंडावर पुरोहित मिळेना
Published on

बेलापूर, ता. ११ (बातमीदार) : उत्सवाच्या काळात शास्त्रोक्त पद्धतीने विधी व्हावा, देवाकडे आपले साकडे पोहोचावे, यासाठी देव आणि भक्त यांच्यातील दुवा म्हणजे पुरोहित. गणेशोत्सव काळात याच पुरोहितांची मागणी सर्वाधिक असते. यंदाच्या वर्षीदेखील गणेशोत्सवाच्या एक महिनाआधीपासूनच गणपती प्राणप्रतिष्ठापना, सत्यनारायण, उत्तरपूजा या विधींसाठी पुरोहितांच्या बुकिंग फुल्ल झाल्या आहेत.

ब्राह्मण हे वेद आणि शास्त्रांचे जाणकार मानले जातात. त्यांना मंत्रांचा योग्य उच्चार आणि विधींचे पालन गणपतीच्या मूर्तीत देवत्व आणण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. १४ सप्टेंबरला साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी सर्वत्र लगबग सुरू असताना, गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सध्या भक्तांकडून पुरोहितांना संपर्क केला जात आहे.

पूजा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सातासमुद्रापार
गणेशोत्सव देशात सर्वत्र साजरा होत असताना, परदेशांतही गणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना करत गणेशोत्सव साजरा केला जातो, मात्र पाश्चात्य भागात उत्सव साजरा करताना पुरोहितांच्या उणिवा भासतात. अशा वेळी परदेशातून भारतातील आपल्या नातेवाइकांद्वारे, कुटुंबाद्वारे ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सने गणेशोत्सव पूजा विधी पार पाडला जात असल्याचे पुरोहितांनी सांगितले.

सर्वांनाच वाटते की, आपली प्राणप्रतिष्ठापना, सत्यनारायण पूजा ब्राह्मणांच्या हातून व्हावी, मात्र सध्या घरोघरी गणपती बसवण्याचे प्रमाण वाढल्याने आमचीदेखील तारांबळ उडते. यासाठी आम्ही मग आमचे कोल्हापूर, पुणे येथील काही सहकारी यांना सांगावा देत त्यांना पूजा करण्याचे आवाहन करतो.
- संदीप कुलकर्णी, गुरुजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com