मुंबई बाजार समितीच्या सचिवपदी राजाराम धोंडकर

मुंबई बाजार समितीच्या सचिवपदी राजाराम धोंडकर
Published on

जुईनगर, ता. ११ (बातमीदार) : राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. धोंडकर यांनी मुंबई बाजार समितीच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई एपीएमसीच्या प्रशासकीय कारभारात आता नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारासंदर्भातील तरतुदींनुसार, अशा बाजार समितीच्या सचिवपदासाठी सहनिबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असल्याचे शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सचिवपदाच्या जबाबदारीत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव म्हणून शरद जरे कार्यरत होते. मात्र, त्यांना त्यांच्या मूळ सहकार विभागाकडे रुजू होण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांच्याकडे मुंबई बाजार समितीच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

मुंबई बाजार समितीमध्ये सध्या पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बाजारातील रस्ते, गटारे, स्वच्छता, पाणीपुरवठा, अग्निसुरक्षा, पार्किंग, बाजार इमारतींची देखभाल तसेच विविध विकासकामांबाबत व्यापारी आणि बाजारातील घटकांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com