

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : शहरातील झोपडपट्टी भागात नियमित लसीकरण, गृहप्रसूती टाळणे आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या दालनात बुधवारी धार्मिक नेत्यांची विशेष बैठक झाली. बैठकीला हिंदू धर्मातील पंडित, मुस्लिम समाजातील उलेमा, बौद्ध धर्माचे प्रतिनिधी, डॉक्टर तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
लहान मुलांना गंभीर; तसेच जीवघेण्या आजारांपासून संरक्षण देण्यासाठी नियमित लसीकरण आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. लसीकरण न करणाऱ्या कुटुंबांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. काही इमारतींमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रवेश दिला जात नसल्याने तेथील मुलांची माहिती आणि लसीकरणाची नोंद मिळविताना येणाऱ्या अडचणींचाही आढावा घेण्यात आला. धार्मिक नेत्यांचे नागरिकांवर मोठे प्रभावक्षेत्र असल्याने त्यांनी आपल्या समाजात स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन आयुक्त सागर यांनी केले. ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रतिनिधींनी सोसायटीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या प्रतिनिधींना बोलावून लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गाडेकर आणि क्षयरोग विभागाच्या प्रभारी अधिकारी डॉ. बुशरा सय्यद उपस्थित होते.
जीविताला धोका
गृहप्रसूतीमुळे माता आणि नवजात बाळाच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. प्रसूतीवेळी अचानक शस्त्रक्रिया, रक्तपुरवठा किंवा अन्य तातडीच्या उपचारांची गरज भासल्यास घरच्या घरी वैद्यकीय मदत उपलब्ध होणे कठीण असल्याने संस्थात्मक प्रसूतीला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.