गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर सीवूड नेक्सस मॉल परिसरात दहशतवादी हल्ल्याची मॉक ड्रिल

गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर सीवूड नेक्सस मॉल परिसरात दहशतवादी हल्ल्याची मॉक ड्रिल
Published on

पोलिसांची धावपळ, बंदुका अन् मॉल बंद!
सीवूड्स नेक्ससमध्ये दहशतवादी हल्ल्याची मॉक ड्रिल
बेलापूर, ता. ११ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ११) सकाळी सीवूड्स नेक्सस मॉलमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याच वेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा, अग्निशमन दल जवानांची धावपळ आणि नवी मुंबई पोलिसांची हातात बंदुका घेऊन क्विक रिस्पॉन्स टीम दाखल झाली. यामुळे मॉलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र थोड्या वेळातच हे मॉक ड्रिल असल्याची घोषणा पोलिसांनी केली अणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शहरात सुरक्षेसाठी पोलिस प्रशासन कायम तत्पर असते. अशातच गर्दीची ठिकाणे म्हणजे रेल्वे स्थानके, बस स्थानके, मॉल कायम दहशतवाद्यांच्या रडारवर असतात. गणेशोत्सव तोंडावर आला असताना दहशतवादी, हल्ल्याच्या धमक्या लक्षात घेत नवी मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. सीवूड्स नेक्सस मॉल हा सर्वाधिक गर्दीचा, वाहतूक कोंडीचा परिसर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम, मॉल व्यवस्थापन टीम, अग्निशमन जवान, एनआरआय पोलिस ठाणे यांनी एकत्रित येत मॉक ड्रिलचे आयोजन केले. भविष्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी नवी मुंबई पोलिस प्रशासनातर्फे दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊ नये. भविष्यातील सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांकडून अशा सरावांचे आयोजन केले जाते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. संकटाच्या वेळी परिसर सुरक्षित करणे आणि परिस्थितीवर कमीत कमी वेळेत नियंत्रण मिळवणे याचे प्रात्यक्षिक यादरम्यान करण्यात आले. मॉक ड्रिलमुळे काही काळासाठी मॉल बंद ठेवत भोवतालच्या परिसरात आपत्कालीन परिस्थितीसारखे चित्र निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com