डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे न्यायालयात हजर

डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रे न्यायालयात हजर
Published on

नगरसेवक रमेश म्हात्रे न्यायालयात हजर
डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरण; १५ सप्टेंबरपासून नियमित सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण केल्याच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह पाच जणांवर कल्याण न्यायालयात शुक्रवारी (ता. ११) आरोप निश्चितीची प्रक्रिया पार पडली. न्या. एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रकरण जलदगतीने पुढे नेण्याचे संकेत देण्यात आले असून, १५ सप्टेंबरपासून नियमित सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय कारंडे आणि साधना कारंडे या पाच जणांविरोधात विष्णूनगर पोलिसांनी एक हजार ८३२ पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी पाचही जण न्यायालयात उपस्थित होते. त्यांच्या वतीने तीन वकिलांनी संयुक्तपणे बाजू मांडली. दोषारोपपत्र मोठे असल्याने त्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली.
दरम्यान, सरकारी पक्षाने सादर केलेली कागदपत्रे तसेच साक्षीदारांची यादी १५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयासमोर सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर कोणती कागदपत्रे मान्य आहेत आणि कोणत्या कागदपत्रांवर बचाव पक्षाचा आक्षेप आहे, याबाबत युक्तिवाद होणार आहे. कागदी तसेच तांत्रिक पुराव्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणाचा निकाल तीन महिन्यांत देण्याचे उद्दिष्ट न्यायालयाने समोर ठेवले आहे.

रमेश म्हात्रे महासभेला हजर
न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रमेश म्हात्रे यांनी कल्याण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेलाही हजेरी लावली. न्यायालयातून थेट महापालिका मुख्यालयात पोहोचल्यानंतर ते सुमारे १५ मिनिटे महासभेत उपस्थित होते. त्यानंतर ते सभागृहातून निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com