

म्हाडा सदनिकांच्या सेवाशुल्कात घट
शिरढोण, खोणी येथील रहिवाशांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे शिरढोण आणि खोणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संबंधित लाभार्थ्यांना लागणाऱ्या सेवाशुल्कात (मासिक देखभाल खर्च) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मासिक ३००-६०० रुपयांची घट होणार आहे. हे सुधारित सेवाशुल्क १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी २१ मे २०२६ रोजी शिरढोण व खोणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांची स्थळ पाहणी केली होती. या वेळी योजनेतील लाभार्थ्यांनी सदनिकांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क कमी करण्याची विनंती करण्यात आली होती. लाभार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत जयस्वाल यांनी सेवाशुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खोणी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांसाठी सध्या आकारण्यात येणारे २,४२२ रुपयांचे मासिक शुल्क १,८०० रुपये करण्यात आले आहे. शिरढोण येथील पीएम आवासच्या सदनिकांसाठी सध्या आकारण्यात येणारे १,९७९ रुपयांचे मासिक शुल्क १,७०० रुपये करण्यात आले आहे. या निर्णयामुळे खोणी येथील लाभार्थ्यांना दरमहा ६२२, तर शिरढोण येथील लाभार्थ्यांना दरमहा २७९ इतका आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.