‘हॉर्लिक्स’चे प्रोटीन पावडर बाजारात

‘हॉर्लिक्स’चे प्रोटीन पावडर बाजारात
Published on

‘हॉर्लिक्स’ची प्रोटीन पावडर बाजारात

नवी दिल्ली, ता. ११ : दैनंदिन आहारातून प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी ‘हॉर्लिक्स’ने प्रोटीन पावडर बाजारात आणली आहे. प्रत्येक सेव्हिंगमध्ये २४ ग्रॅम प्रोटीन आणि चार ग्रॅम प्रीबायोटिक फायबर असलेले हे उत्पादन एकावेळी वापरता येणाऱ्या पाकिटांच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. काम, प्रवास आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनात सहज वापरता यावे, हा त्यामागील उद्देश आहे. या उत्पादनात ‘फर्मेंटेड यीस्ट प्रोटीन’चा वापर करण्यात आला असून, त्यात शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अत्यावश्यक अमिनो आम्ले आहेत. उत्पादनाचा पीडीसीएएएस (प्रोटीन डायजेस्टिबिलिटी-करेक्टेड अमिनो ॲसिड स्कोअर) १.० आहे. तसेच, त्यात प्रीबायोटिक फायबर म्हणून इन्युलिन आणि प्रोटीनच्या पचनास मदत करणारे पपेन हे वनस्पतीजन्य एन्झाइम आहे. फर्मेंटेड यीस्ट प्रोटीन नैसर्गिकरीत्या लॅक्टोजमुक्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हॉर्लिक्सचे हे प्रोटीन पावडर चॉकलेट, कॉफी आणि अनफ्लेवर्ड अशा तीन प्रकारांत उपलब्ध आहे. एका किलोच्या पॅकमध्ये प्रत्येकी एक सेव्हिंग असलेली २८ पाकिटे आहेत. त्यामुळे पावडर मोजण्यासाठी वेगळ्या स्कूपची गरज नसून, प्रवासातही ते सहज नेता येते. देशभरातील किरकोळ विक्री केंद्रांसह निवडक ऑनलाइन माध्यमांवर हे उत्पादन उपलब्ध करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com