

गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी रंगणार सोसायट्यांची स्पर्धा
‘बिर्ला ओपसचा मान’ उपक्रम; आतापर्यंत ४००हून अधिक सोसायट्यांकडून नोंदणी
मुंबई, ता. १२ : ढोल-ताशांचा गजर, आकर्षक आरास, रोषणाई, फुलांची सजावट आणि देखाव्यांमधून दिले जाणारे सामाजिक संदेश... गणेशोत्सवात सोसायट्यांमधील सजावटीला विशेष महत्त्व असते. याच कल्पकतेला आणि पर्यावरणपूरक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी बिर्ला ओपस पेंट्सतर्फे ‘बिर्ला ओपसचा मान’ हा गणेशोत्सव सजावट उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमात आतापर्यंत ४००हून अधिक सोसायट्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या स्पर्धेत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती येथील सोसायट्या सहभागी होणार आहेत. सोसायट्यांमधील गणेशोत्सवाला एकत्रितपणा आणि सर्जनशीलतेची जोड मिळत असल्याने सजावटीतही नवनवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत. यंदा पारंपरिक कलाकुसरीपासून पर्यावरणपूरक सजावटीपर्यंत विविध संकल्पना या स्पर्धेतून समोर येणार आहेत. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सोसायट्यांमध्ये रहिवासी एकत्र येऊन बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. आरती, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांसाठी विविध स्पर्धा अशा उपक्रमांमुळे उत्सवाला सामूहिक स्वरूप येते. त्याचबरोबर गणेशमूर्तीची निवड, सजावटीची संकल्पना, देखाव्याची आखणी आणि त्याची प्रत्यक्ष उभारणी यासाठी रहिवाशांचा सहभाग वाढला आहे. काही ठिकाणी साधेपणातून सौंदर्य खुलविले जाते, तर काही ठिकाणी पुनर्वापराच्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक सजावट केली जाते.
या पार्श्वभूमीवर ‘बिर्ला ओपस बाप्पाचा मान’ स्पर्धेत सजावटीतील वैविध्य, कलात्मकता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला महत्त्व मिळणार आहे. हाउसिंग सोसायट्या, अपार्टमेंट्स, कॉम्प्लेक्स आणि टाऊनशिप्स यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, सार्वजनिक गणेश मंडळांना यात सहभागी होता येणार नाही. सोसायट्यांनी साकारलेल्या आगळ्यावेगळ्या सजावटीला राज्य स्तरावर ओळख मिळवून देण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.
-----
‘बिर्ला ओपसचं घर’ ठरणार आकर्षण
तीन श्रेणींपैकी ‘सर्वोत्कृष्ट बिर्ला ओपसचं घर’ ही विशेष श्रेणी लक्ष वेधून घेत आहे. गणेशमूर्ती काही दिवसांसाठी घरी विराजमान होते. त्यामुळे स्वागताबरोबरच तिच्यासाठी सुंदर आणि आकर्षक निवास साकारण्याचा प्रयत्न केला जातो. याच भावनेला सर्जनशीलतेची जोड देत बिर्ला ओपस पेंट्सचा आकर्षक आणि नावीन्यपूर्ण वापर करून घर अधिक सुंदर करण्याची संधी या श्रेणीत सोसायट्यांना मिळणार आहे. या श्रेणीसाठी साकारण्यात येणारी संकल्पना घराशी निगडित असणे आवश्यक आहे. घर, मंदिर, किल्ला, राजवाडा, झोपडी, अपार्टमेंट आदी संकल्पनांचा वापर करता येईल. या संकल्पनेचे रंगकाम करताना बिर्ला ओपस पेंट्सचा वापर केलेला असणे आवश्यक आहे.
-----
अशा संकल्पना येतील साकारता
राजवाडा
पारंपरिक मराठी वाडा
सुंदर ग्रामीण घर
फुलझाडे व हिरवाईने सजलेले घर
डोंगरातील सुंदर घर
समुद्रकिनाऱ्यावरील ‘ड्रीम होम’
भविष्यातील किंवा अंतराळातील घर
आवडत्या किल्ल्याची प्रतिकृती
आवडत्या मंदिराची प्रतिकृती
----
पुरस्कारांच्या तीन श्रेणी
सर्वाधिक वैविध्यपूर्ण गणेशमूर्ती
सर्वोत्कृष्ट पर्यावरणपूरक सजावट
सर्वोत्कृष्ट ‘बिर्ला ओपस बाप्पांचं घर’
-----
तीन प्रमुख बक्षिसे
प्रथम क्रमांक : ५० हजार रुपये
द्वितीय क्रमांक : २१ हजार रुपये
तृतीय क्रमांक : ११ हजार रुपये
-----
पर्यावरणपूरक सजावटीला प्रोत्साहन
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच पर्यावरणाची काळजी घेण्यावरही उपक्रमात भर देण्यात आला आहे. नैसर्गिक वस्तू, पुनर्वापर करता येणारे साहित्य तसेच उपलब्ध वस्तूंचा कल्पक वापर करून केलेल्या सजावटीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी सोसायटीस रु. ५,००० /- मानधन *
-----
क्यूआर कोडद्वारे सहभाग
उपक्रमात सहभागी होण्यासाठी दिलेल्या क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीनंतर सोसायटीतील गणेशोत्सवाची सजावट, देखावा आणि आवश्यक माहिती सादर करता येणार आहे. गणेशभक्तांनी आणि सोसायट्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बाप्पावरील प्रेम, उत्सवाचा उत्साह आणि सजावटीतील सर्जनशीलता व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. संपर्क : +९१ ९१३७० ०२३५२ नियम व अटी लागू.
अधिक माहितीसाठी : www.birlaopus.com/tne
-----
मुंबईकरांसाठी नऊ पुरस्कारांची संधी
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवातील भक्ती, उत्साह आणि सर्जनशीलतेला रंग देण्यासाठी बिर्ला ओपस पेंट्सतर्फे ‘बाप्पाचा मान मनात’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गणरायांप्रती असलेले प्रेम आणि गणेशोत्सवाचा उत्साह व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. मुंबईसाठी एकूण नऊ पुरस्कार देण्यात येणार असून, त्यात तीन प्रथम, तीन द्वितीय आणि तीन तृतीय क्रमांकाचे पुरस्कार आहेत. मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गणेशोत्सवाचा आनंद ‘बाप्पाचा मान मनात’सोबत साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.