मातीच्या गणपतीतून पर्यावरणाचा संदेश

मातीच्या गणपतीतून पर्यावरणाचा संदेश
Published on

मातीच्या गणपतीतून पर्यावरणाचा संदेश
‘सकाळ एनआयई’ची कार्यशाळा; विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कांदिवली, ता. १३ : सह्याद्रीनगर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील प्राथमिक विद्यालयात ‘सकाळ एनआयई’ प्रस्तुत पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा शुक्रवारी (ता. ११) दुपारी १ वाजता उत्साहात पार पडली. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देतानाच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेस विद्यालयाच्या शाळा कमिटीचे ज्येष्ठ सदस्य मदन चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योतीताई ताईगडे, उपाध्यक्षा शीतल डुबल, नूतन मुसळे, व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सुनीता सोळस्कर, तेजश्री पवार तसेच सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी फडतरे उपस्थित होत्या.
स्वतःच्या हाताने काहीतरी नवीन आणि सुंदर निर्माण केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणपती तयार करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा उप्पलकर यांनी केले, तर प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाकांत जगताप यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील श्रीधर नादरगे, श्रुतिका पाटील, करुणा मोरे व संपत अनपट यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिक्षक, पालकांचाही सहभाग
विद्यार्थ्यांनी विविध आकारांचे सुंदर पर्यावरणपूरक गणपती साकारले. पाहता पाहता विद्यालयात अनेक छोटे छोटे गणराय आकाराला आले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व पालकांनीही गणपती बनविण्याचा आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com