सिडकोच्या ‘माझा १st चॉइस’ योजनेतील ४,७७९ घरांची संगणकीय सोडत संपन्न

सिडकोच्या ‘माझा १st चॉइस’ योजनेतील ४,७७९ घरांची संगणकीय सोडत संपन्न
Published on

सिडकोच्या ‘माझा फर्स्ट चॉइस’ योजनेतील ४,७७९ घरांची संगणकीय सोडत संपन्न
३,१४२ अर्जदार विजेते
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ११ : सिडकोच्या बहुचर्चित ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर-माझा फर्स्ट चॉइस’ या गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या चार हजार ७७९ सदनिकांसाठीची संगणकीय सोडत शुक्रवारी (ता. ११) सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात पार पडली. पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने झालेल्या या सोडतीत तीन हजार १४२ अर्जदार विजेते ठरले असून, त्यांचे नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे.
या सोहळ्यास सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, एनआयसीचे संचालक (आयटी) लक्ष्मीकांत गरजे, संचालक (आयटी) नरेंद्र भामरे, पणन व्यवस्थापक (गृहनिर्माण) श्रीनिवास मोकळीकर यांच्यासह सिडकोचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. योजनेचा तपशील सिडकोतर्फे १५ ऑगस्टला या गृहनिर्माण योजनेचे उद्‍घाटन केले होते. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील विविध मोक्याच्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या. हा निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध या संगणकीय सोडतीमधील सर्व यशस्वी (विजेत्या) तीन हजार १४२ अर्जदारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर-माझा फस्ट चॉइस’ या गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना नवी मुंबईसारख्या नियोजित व जागतिक दर्जाच्या शहरात परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर उपलब्ध करून देणे, हा सिडकोच्या गृहनिर्माण उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे. या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांचे गृहस्वप्न साकार होत असून, पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशक गृहनिर्माणाच्या दिशेने सिडकोची वाटचाल सुरू आहे.
- अश्विन मुदगल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

तळोजा सेक्टर-३९: ४,२२९ सदनिका
खारघर बस डेपो : २९३ सदनिका
कळंबोली बस डेपो : २५७ सदनिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com