गणरायाच्या सुरक्षेसाठी ‘फौज’ सज्ज!

गणरायाच्या सुरक्षेसाठी ‘फौज’ सज्ज!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहरातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी आयुक्तालयातील पाचही परिमंडळांत दोन हजार २९४ पोलिस अंमलदार आणि ६१३ महिला अंमलदार तसेच राज्य राखीव पोलिस दल ‘एसआरपीएफ’च्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ८०० पुरुष आणि २०० महिला होमगार्डही बंदोबस्तात सहभागी होणार आहेत.

गणेश चतुर्थीच्या दिवशी सोमवारी (ता. १४) एकाच दिवशी एक लाख ८२ हजार ६१४ गणेशमूर्ती स्थापना होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात शहरापासून ग्रामीण भागापर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. याचदरम्यान गणेशोत्सवात मंडप, गणेश दर्शनासाठी होणारी गर्दी, आगमन-विसर्जन मिरवणुका आणि संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. पाचही परिमंडळांतील स्थानिक बंदोबस्ताबरोबरच इतर शाखांकडूनही अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

वरिष्ठ स्ट्रायकिंग फोर्सही सज्ज...
स्थानिक बंदोबस्ताबरोबरच इतर शाखांकडून ३९० पोलिस अंमलदार आणि १८५ महिला अंमलदारांचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. वरिष्ठ स्ट्रायकिंग तसेच नियंत्रण स्ट्रायकिंग पथकेही तैनात ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी या पथकांचा वापर केला जाणार आहे. बंदोबस्तादरम्यान पोलिसांमधील संपर्क व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वॉकी-टॉकी आणि वायरलेस जीपीएस सेट मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त गस्त ठेवण्यात येणार आहे.

महासंचालकांकडे अतिरिक्त कुमक मागितली
गणेशोत्सवाचा वाढता व्याप लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी राज्य पोलिस महासंचालकांकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. त्यामध्ये २० निरीक्षक, १२० सहाय्यक निरीक्षक/उपनिरीक्षक, ५०० अंमलदार, १०० महिला अंमलदार आणि एसआरपीएफच्या तीन कंपन्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सवाच्या पुढील टप्प्यात बंदोबस्तासाठी आणखी कुमक उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

बंदोबस्तासाठी अंमलदार तैनात
परिमंडळ पुरुष महिला
१ २७५ २१
२ ४२८ ४५
३ ३९७
४ ४८० ७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com