

उल्हासनगर, ता. १३ (वार्ताहर) : ‘श्री गणेशोत्सव २०२६’ विशेष सवलत योजनेअंतर्गत थकबाकीसह चालू मालमत्ता कर एकरकमी भरणाऱ्या नागरिकांना विलंब शास्तीत १०० टक्क्यांपर्यंत माफी मिळणार आहे. उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ही सवलत जाहीर केली असून योजना तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासोबतच करदात्यांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने ‘श्री गणेशोत्सव २०२६’ विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी १२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान तीन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते २० सप्टेंबरदरम्यान थकबाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास थकबाकीवरील विलंब शास्ती १०० टक्के माफ केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान चालू कराची संपूर्ण थकबाकी भरल्यास ७५ टक्के विलंब शास्ती माफ होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण थकीत व चालू करासह ५० टक्के शास्ती भरल्यास उर्वरित ५० टक्के विलंब शास्ती माफ केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात कराचा संपूर्ण भरणा केल्यास विलंब शास्तीत १०० टक्के माफी मिळणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत कर भरावा.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.