

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या काळात गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात होणाऱ्या कर्णकर्कश डीजेच्या दणदणाटाला यंदा चाप लावण्याची भूमिका सहकार विभागाने घेतली आहे. सोसायटीच्या आवारात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून डीजे अथवा ध्वनिक्षेपक वाजविल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि व्यवस्थापन समितीला जबाबदार धरले जाणार आहे. यासंदर्भात अंबरनाथ तालुक्याचे सहाय्यक निबंधक राजेंद्र विठ्ठल मरकड यांनी सर्व गृहनिर्माण संस्थांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांना याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने सोसायट्यांना आधीच सावध केले आहे. गृहनिर्माण सोसायट्या या निवासी परिसरात येत असल्याने तेथे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, मात्र अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या डीजेचा वापर केला जातो. प्रचंड बेस आणि कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. सोसायटीच्या आवारात नियमबाह्य पद्धतीने डीजे किंवा ध्वनीक्षेपक वाजविल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित संस्थेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापन समितीला जबाबदार धरले जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.