मेट्रो मार्गिकांवर विशेष ब्लॉक

मेट्रो मार्गिकांवर विशेष ब्लॉक
Published on

मेट्रो मार्गिकांवर विशेष ब्लॉक
९चा टप्पा दोनसाठी विविध चाचण्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दहिसर-मिरा-भाईंदर दरम्यानच्या मेट्रो मार्गिका ९चा दुसरा टप्पा लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी या टप्प्यातील तीन अतिरिक्त स्थानकांचे सध्या कार्यरत असलेल्या मेट्रो मार्गिका ९ टप्पा-१ तसेच मेट्रो नेटवर्कशी एकात्मीकरण (इंटीग्रेशन) करण्यासाठी ‘एमएमओसीएल’कडून आवश्यक सिग्नलिंग आणि मेट्रो गाड्यांच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यासाठी १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत सकाळच्या सत्रात विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा १ वरील प्रवासी सेवा सकाळी ६ ऐवजी ६:३० वाजता सुरू होणार आहेत.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमओसीएल) घेतल्या जाणाऱ्या या विशेष ब्लॉकमुळे तांत्रिक पथकांना सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे मायग्रेशन, चाचणी आणि प्रमाणीकरण सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक सलग वेळ उपलब्ध होईल. त्याच वेळी प्रवासी सेवांवरील परिणाम केवळ सकाळच्या मर्यादित कालावधीपुरता ठेवण्यात आला आहे. याची प्रवाशांनी नोंद घेत आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एमएमओसीएलने केले आहे. दरम्यान, मेट्रो मार्गिका ९ टप्पा २ च्या वेग चाचण्यांसाठी आवश्यक सिग्नलिंग सॉफ्टवेअर आता उपलब्ध झाले असून, त्यामुळे चाचणी आणि कार्यान्वयन प्रक्रियेतील पुढील महत्त्वाचा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मार्गिका ९ टप्पा-२ चे कार्यरत मेट्रो मार्गिका २अ, ७ आणि मार्गिका ९ टप्पा-१ शी सुरळीत एकात्मीकरण करण्यात येणार असल्याने, नवीन टप्प्यावरील सिग्नलिंग प्रणालीची विद्यमान कार्यरत नेटवर्कसोबत चाचणी आणि प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.
..
तांत्रिक चाचण्यांना वेग
मेट्रोच्या चारकोप डेपोतील ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (ओसीसी)मार्फत सिग्नलिंग सॉफ्टवेअरचे नियंत्रित स्थलांतर व चाचणी करण्यात येणार आहे. विद्यमान मार्गिकांवर नियमित प्रवासी सेवा सुरू असल्याने, या महत्त्वपूर्ण तांत्रिक चाचण्या प्रवासी सेवा बंद असलेल्या नियंत्रित कालावधीतच घेणे आवश्यक असल्याचे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com