गायमुख घाटात डंपर उलटून कारला धडक

गायमुख घाटात डंपर उलटून कारला धडक
Published on

गायमुख घाटात डम्पर उलटून कारला धडकला
रेतीच्या पिशव्या रस्त्यावर विखुरल्याने वाहतूक कोंडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात २८ टन रेती वाहून नेणाऱ्या चालकाचे डम्परवरील नियंत्रण सुटल्याने तो उलटून बाजूने जाणाऱ्या एका कारला धडकला. हा अपघात रविवारी पहाटे घडला. यात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र डम्परमधील रेतीच्या पिशव्या रस्त्यावर विखुरल्याने घोडबंदर-ठाणे मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.
ठाण्यातील गायमुख घाटातील पोलिस चौकीजवळ अपघात झाल्याची माहिती रविवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती मिळाली. चालक हबीब हा डम्पर घेऊन गुजरातहून माजिवड्याच्या दिशेने येत होता. डम्परमध्ये सुमारे २८ टन रेती होती. गायमुख घाटातून ठाण्याकडे उतरताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्या वेळी बाजूने नालासोपारा ते कल्याण या मार्गावर जाणाऱ्या अरविंद कुमार यांच्या कारला डम्परची धडक बसली. धडकेनंतर डम्पर रस्त्यावरच उलटला. अपघाताची माहिती मिळताच गायमुख वाहतूक पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे एक रेस्क्यू वाहन, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे एक पिकअप वाहन आणि जेसीबी घटनास्थळी आणण्यात आला. वाहतूक पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर पडलेल्या रेतीच्या पिशव्या बाजूला केल्या. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनाचा अडथळा दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com