

कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात २०२५ मध्ये गणेशमूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी पाच कोटी २६ लाख खर्च झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. विसर्जनासाठी उभारण्यात आलेले कृत्रिम हौद, सिंटेक्स टाक्या, फिरते विसर्जन कक्ष तसेच अन्य व्यवस्थांसाठी करण्यात आलेल्या एकूण १०५ कामांवर हा खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त माहितीत नमूद आहे.
विजय ठाकरे यांनी महापालिकेकडे माहितीच्या अधिकारात गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम हौदांची संख्या, निविदा, खर्च तसेच विसर्जनानंतर मूर्तींची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते, याबाबत माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, पालिका क्षेत्रातील एकूण १० प्रभागांसाठी १० लाखांपेक्षा कमी रकमेच्या ९८ निविदा, तर १० लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सात निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. २०२५ मध्ये कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात अंदाजे ५२ हजार गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. यामध्ये २९३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश होता. कल्याण शहरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी २२ नैसर्गिक विसर्जनस्थळे, पाच कृत्रिम हौद, ३२ सिंटेक्स टाक्या आणि चार फिरते विसर्जन कक्ष, तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ या उपक्रमाद्वारे एकूण ६५ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तर डोंबिवलीत ३० नैसर्गिक विसर्जन स्थळे, एक कृत्रिम हौद, ३० सिंटेक्स टाक्या आणि चार फिरते विसर्जन कक्ष, तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे एकूण ६५ ठिकाणी विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
महापालिकेने विसर्जन व्यवस्थेतील प्रत्येक खर्चाचा हिशेब तसेच विसर्जनानंतरच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी विजय ठाकरे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.