पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘बदला’ची गरज

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ‘बदला’ची गरज
Published on

ठाणे, ता. १३ (बातमीदार) : गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा सण असला तरी त्याच्या उत्सवपद्धतीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, यासाठी नागरिकांनी आपल्या सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे. मूर्तीचा आकार कमी करण्यापासून ते ध्वनिप्रदूषण टाळण्यापर्यंत अनेक पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याचे आवाहन पर्यावरण दक्षता मंडळाने केले आहे.

पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष संजय जोशी यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज अधोरेखित केली. उत्सवाच्या नावाखाली निसर्गाची हानी होऊ नये, यासाठी नागरिकांनी अधिक जबाबदारीने उत्सव साजरा करावा, असे त्यांनी सांगितले. मंडळाने गणेशमूर्ती शक्यतो लहान आकाराची असावी आणि शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. कागद, नारळाच्या शेलसारख्या पर्यावरणपूरक माध्यमांपासून तयार केलेल्या मूर्तींचाही पर्याय नागरिकांनी स्वीकारावा, असे मंडळाने स्पष्ट केले. आतापर्यंत मंडळाच्या माध्यमातून सुमारे ७५० ते ८०० पर्यावरणपूरक गणेशमूर्ती नागरिकांसोबत तयार करण्यात आल्या आहेत. सजावटीसाठी दरवर्षी नवीन साहित्य खरेदी करण्याऐवजी पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. प्लास्टिकची फुले आणि अन्य प्लास्टिक साहित्य टाळून प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले.

मिरवणुकीचा गोंगाट नको
गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा प्रश्नही मंडळाने उपस्थित केला. गणपतीला मधुर आरती आवडते की मोठ्या आवाजातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेची आरती, असा सवाल करत डीजे आणि मोठ्या आवाजातील ध्वनियंत्रणांचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. डीजेविरोधातील भूमिका ही गणपतीविरोधी नसून ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी असल्याचे मंडळाने स्पष्ट केले.

“गणपती हा पर्यावरणाचा ‘अॅम्बेसेडर’ आहे. श्रद्धा जपत निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. लोकांच्या मनात बदल झाला तरच पर्यावरणपूरक गणेशोत्सव खऱ्या अर्थाने शक्य होईल.”
— सुरभी ठोसर, प्रकल्प प्रमुख, पर्यावरण दक्षता मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com