

नवी मुंबई पालिकेकडून सेवा संकल्प अभियान
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील २५ वर्षांच्या कार्यकाळाचे औचित्य साधून राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवले जात आहे. नवी मुंबई पालिकेने या अभियानासाठी कंबर कसली असून, संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत या अभियानाची रूपरेषा ठरवण्यात आली.
अभियानातील ‘सेवा सेतू’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई पालिका क्षेत्रातील आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती, गटारे आणि आरोग्य सुविधांचे सर्वसमावेशक सर्वेक्षण करून तेथे तातडीने सुधारणा हाती घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक आदिवासी पाड्यासाठी एका पालक अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार असून, सर्व शासकीय व पालिकेच्या योजना या घटकांपर्यंत पोहोचवल्या जातील. याशिवाय, नागरिकांना लागणारे जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी आणि मालमत्ता कराची विविध प्रमाणपत्रे विनाविलंब मिळावीत यासाठी शून्य प्रलंबितता मोहीम आखून विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. लोकसहभागावर आधारित सेवा माझे योगदान उपक्रमांतर्गत शहरभर स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार घरापासूनच कचऱ्याचे ४ प्रकारात वर्गीकरण करणे आणि सिंगल युज प्लास्टिकवर पूर्ण बंदी आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. जनसेवक महाकुंभ उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींचा थेट सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे. शहरभर रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी त्यांच्या डिजिटल साक्षरतेवर विशेष भर दिला जाणार आहे.
शालेय स्पर्धा व प्रोत्साहन
माझ्या स्वप्नातील भारत आणि विकसित भारत अशा विषयांवर चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळा, विभाग कार्यालये आणि विजेत्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.