

रोह्यात अहिल्यादेवींचे स्मारक उभारणार
वास्तू पर्यटकांचे आकर्षण ठरणार
रोहा, ता. १५ (बातमीदार) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास जाज्वल्य असून, प्रजेला न्याय, सुख आणि सुरक्षा देणे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. रोह्यात उभारण्यात येणारे त्यांचे स्मारक भव्य आणि देखणे असावे. हे स्मारक पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक रोह्यात येतील आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेतील, असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
रोहा नगर परिषदेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
१९७४ मध्ये तत्कालीन नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी रोह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुष्करणी उद्यान साकारले. पुढील वर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा निर्धार तटकरे यांनी व्यक्त केला. अहिल्यादेवींनी महिलांच्या अधिकारांसह समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार केला, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
चौकट :
अहिल्यादेवींचे विचार प्रेरणादायी
अहिल्यादेवींनी आपल्या काळातच महिलांना अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार करण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासाचा त्यांनी विचार केला. शिवसृष्टीचा विस्तारित विकास आणि अहिल्यादेवींचा पुतळा तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात येईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.