जिल्ह्यातील आणखी १,३७४ शेतकरी कर्जमुक्त

जिल्ह्यातील आणखी १,३७४ शेतकरी कर्जमुक्त
Published on

जिल्ह्यातील आणखी १,३७४ शेतकरी कर्जमुक्त
अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत दुसरी यादी प्रसिद्ध
अलिबाग, ता. १५ (वार्ताहर) : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी शुक्रवारी (ता. ११) प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एक हजार ३७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
योजनेअंतर्गत १ एप्रिल २०११ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत वितरित झालेली व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे, पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यातील बँकांनी योजनेच्या पोर्टलवर १२ हजार ६८२ थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे.
आतापर्यंत सात हजार ३६७ पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली असून, त्यापैकी आधार प्रमाणीकरण झालेल्या तीन हजार ३९२ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात २०.४६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसरी यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव तपासून आपले सेवा केंद्रात आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com