

ठाणे, ता. १५ : रिक्षातून प्रवास करताना विसरलेली सुमारे सहा लाखांचे सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तू असलेली बॅग वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोधून काढली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचा माग काढत पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत करून तक्रारदाराच्या स्वाधीन केला.
तुषार नाईक हे पत्नीसह रविवारी (ता. १३) ठाणे रेल्वे स्थानक ते काजूवाडी असा रिक्षाने प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान सुमारे चार तोळे वजनाचे दागिने असलेली त्यांची बॅग रिक्षामध्येच राहून गेली. त्यानंतर तुषार यांनी वागळे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिस अंमलदार स्वप्नील पाटील, नितीन जाधव आणि कल्पेश चौधरी यांनी ठाणे रेल्वे स्थानकापासून काजूवाडीपर्यंतच्या परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. रिक्षाच्या हालचालींचा माग काढत पोलिसांनी संबंधित रिक्षाचा शोध घेतला. अवघ्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रिक्षा शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यामधून सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हस्तगत केलेला मौल्यवान मुद्देमाल वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या हस्ते तक्रारदार तुषार नाईक यांना सुपूर्द करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.