आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाने फसवणूक

आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाने फसवणूक
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून व्यावसायिकाची २८ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी श्री गॅलेक्सी फायनान्शियल कंपनीशी संबंधित मनोज गुळेकर आणि विनायक जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अन्य ३५ गुंतवणूकदारांचीही तब्बल १३ कोटी ७० लाख ९६ हजारांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत.

मुंब्रा येथील अनिल वसंत कुंभार (वय ३८) हे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. गुळेकर आणि जगदाळे यांच्याशी त्यांची गेल्या १० वर्षांपासून ओळख होती. गुळेकर हे कुंभार यांची वाहन भाड्याने घेत असल्याने त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. त्याच ओळखीचा फायदा घेत दोघांनी श्री गॅलेक्सी फायनान्शियल कंपनीत पैसे गुंतवल्यास शेअर मार्केट व जमीन व्यवसायातून नफा मिळवून दरमहा चार ते आठ टक्के परतावा देण्याचे सांगितल्याचा दावा आहे. कुंभार यांनी भावाच्या खात्यातून तसेच स्वतःच्या व्यवसायातील पैशातून नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ७५ लाख ६४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यापैकी आतापर्यंत ४७ लाख ३८ हजार रुपये परतावा मिळाला असून, २८ लाख २५ हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत.

फेब्रुवारीनंतर परतावा बंद झाल्याने कुंभार यांनी कंपनीकडे विचारणा केली. त्या वेळी शेअर बाजाराची परिस्थिती खराब असल्याचे सांगून पैसे लवकरच परत देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळाले नाहीत. मार्चमध्ये भेट घेतल्यानंतरही दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे कुंभार यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com