

श्रीवर्धनमध्ये अनेक बांधकामांचा राडारोडा रस्त्यावर
अपघाताचा धोका
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर) : शहरात निवासी संकुले, रिसॉर्ट आणि होम-स्टेचे बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू असताना बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित राडारोडा आणि साहित्य रस्त्याच्या कडेला तसेच गटारांमध्ये टाकून देण्याचे प्रकार वाढले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर वाहनांसह भाविकांची वर्दळ वाढल्याने या राडारोड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
शहरातील विविध पाखाड्या आणि आळ्यांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांदरम्यान लोखंडी शिगा, चिरे, रेती, क्रश सॅन्ड, खडी, विटा व माती रस्त्याच्या कडेला अथवा गटारांमध्ये टाकली जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधितांकडून हा राडारोडा हटविला जात नसल्याने वाहतुकीमुळे तो रस्त्यावर पसरतो. पावसामुळे रस्त्यावर पसरलेल्या खडी व रेतीवरून दुचाकी घसरण्याची शक्यता वाढली आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, अपघाताची मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित घरमालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. नगर परिषदेने बांधकामानंतर रस्त्यावर राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोषींवर कारवाई करणार
बांधकाम करताना विटा, रेती, माती व इतर साहित्य गटारांमध्ये आणि रस्त्यावर ठेवले जाते. काम पूर्ण झाल्यानंतरही हा राडारोडा तसाच राहिल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. अशा सर्व संबंधित घरमालकांना तत्काळ नोटिसा बजावण्यात येतील. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.