आवरे येथे घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद उरण पोलिसांची धडक कारवाई,

आवरे येथे घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद उरण पोलिसांची धडक कारवाई,
Published on

आवरे येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद
उरण, ता. १५ (बातमीदार) ः घराच्या उघड्या खिडकीतून आत प्रवेश करून दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला उरण पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने अटक केली आहे. अनिल नाईक असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून नऊ लाख ६४ हजार ३०० रुपये किमतीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
उरण तालुक्यातील आवरे येथे १७ जुलै रोजी एका बंद घराच्या खिडकीतून चोरट्याने प्रवेश करून नऊ लाख ७७ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीची ओळख पटवली. आरोपी सराईत गुन्हेगार असून, तो सतत आपले ठिकाण बदलत होता. सोलापूर, अक्कलकोट, चाकण, आदमापूर, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी लॉज आणि डॉर्मेटरीमध्ये तो राहत होता. पोलिसांनी कोल्हापूर ते पनवेल असा प्रवास करत असताना मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर टोलनाक्याजवळ त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, आरोपीवर नवी मुंबई आणि रायगड परिसरात यापूर्वी घरफोडी व जबरी चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com