गणेशोत्सव काळात बंदी असतानाही मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक सुरु,

गणेशोत्सव काळात बंदी असतानाही मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहतूक सुरु,
Published on

गणेशोत्सव काळात बंदी असतानाही मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक सुरू
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, स्थानिक प्रशासन सुस्त
रोहा, ता. १५ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे, मात्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाला हरताळ फासत जेएनपीए ते महाड एमआयडीसी तसेच रोहा रेल्वे यार्ड ते विळे-भागाड येथील भागात अवजड लोखंडी कॉईल्सची वाहतूक ऐन सणाच्या काळात आणि भरदिवसा सुरू आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या सुस्त कारभारावर गणेशभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोकणातील गणेशोत्सवासाठी चाकरमानी कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने आपल्या गावी दाखल होत असतात. रस्त्यावरील वाढती वाहतूक आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत महामार्गावर अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घातली होती. असे असतानाही महामार्गावर बंदी असलेल्या अवजड वाहनांची वर्दळ सुरूच आहे. सध्या बाजारातील गर्दी आणि विशेष रेल्वे गाड्यांमुळे रोहा व परिसर आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त आहे. त्यातच या अवजड वाहनांमुळे महामार्गावर मोठ्या अपघाताची आणि भीषण वाहतूक कोंडीची टांगती तलवार निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उघडपणे उल्लंघन होत असतानाही संबंधित पोलिस व महसूल प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

बंदी उल्लंघनप्रकरणी कारवाईचा बडगा
अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी असतानाही मंगळवारी (ता. १५) सकाळी कोलाडजवळील पूई येथे घातक रसायन वाहतूक करणारा कंटेनर पलटी होऊन अपघात घडला. या अपघानंतर महामार्गावरील अवजड वाहन वाहतूक बंदीचे नियम उल्लघंन केल्याबद्दल संबंधित वाहनचालकाविरोधात आरटीओमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती कोलाड पोलिस ठाण्याचे प्रभारी भारतफारने यांनी दिली.


गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. असे असताना या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अवजड वाहनचालक व मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- हरिश्चंद्र महाडिक, सुतारवाडी, रोहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com