भिवंडीत इस्कॉनच्या ‘मेगा किचन’चे भूमिपूजन

भिवंडीत इस्कॉनच्या ‘मेगा किचन’चे भूमिपूजन
Published on

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : गरजूंसाठी अन्नदानाची सेवा अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने इस्कॉन भिवंडी मंदिरातर्फे मानसरोवर येथे ‘मेगा किचन’ संकुल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी धार्मिक विधींनी उत्साहात करण्यात आले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज १५ हजार व्यक्तींसाठी भोजन तयार करून त्याचे वितरण करण्याची क्षमता निर्माण होणार आहे.
इस्कॉन भिवंडीतर्फे २०२० मध्ये कोरोना काळात गरजूंसाठी मोफत भोजन वितरणाची सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला दररोज २०० भोजनांचे वितरण केले जात होते. या सेवेला वाढता प्रतिसाद मिळाल्यानंतर सध्या दररोज १,५०० गरजूंना भोजन दिले जाते. स्थलांतरित कामगार, गर्भवती महिला, शालेय विद्यार्थी, रोजंदारीवरील कामगार, झोपडपट्टीतील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, बेघर व्यक्ती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत हे भोजन पोहोचविले जाते. या सेवेचा विस्तार करण्यासाठी १५ हजार भोजनांची दैनंदिन क्षमता असलेल्या ‘मेगा किचन’ची उभारणी करण्यात येत असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापक सुदामा प्रभू यांनी दिली.
या वेळी भिवंडीसह हैदराबाद व सिरसिल्ला फार्म मंदिर प्राधिकरणाचे प्रमुख सीताराम प्रभुजी, भक्तिवेदांत बुक ट्रस्टचे प्रभारी षड्भुज गौर प्रभुजी, इस्कॉन अत्तापूर, हैदराबादचे अध्यक्ष चैतन्य अवतार प्रभुजी, भिवंडी संस्थेचे व्यवस्थापक नरोत्तम प्रभुजी, मंदिर व्यवस्थापक सुदामा प्रभुजी, ईशान गौर प्रभुजी, भावमय नित्यानंद प्रभुजी यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी, प्रसाद पाटील, विराज पवार, सोनू देशमुख आणि मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com