नवी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले गणेशदर्शन

नवी मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले गणेशदर्शन
Published on

नवी मुंबईतील १५ प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
गणेशदर्शनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांचे निवेदन
नवी मुंबई, ता. १५ : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन गणेशदर्शन घेतले. जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांच्या निवासस्थानी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांचा आढावा घेतला.
या वेळी रस्ते, आरोग्य, वाहतूक, क्लस्टर विकास, क्रीडा सुविधा, रेल्वे स्थानके आणि रोजगारासह १५ प्रमुख प्रश्नांचे निवेदन कार्यकर्त्यांनी सादर केले. क्लस्टर योजनेतील अडचणी दूर करून पुनर्वसनाला गती देणे, पालिकेच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजमधील अडथळे दूर करणे, सावला रुग्णालय सुरू करणे आणि नवीन आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली.
पाम बीच मार्गावरील अपघात रोखण्यासाठी अंडरपास किंवा उड्डाणपूल, वाहतूक कोंडीवर उपाय, सेक्टर ५० येथे इनडोअर स्टेडियम व जलतरण तलाव, खाडीकाठी जॉगिंग ट्रॅक, रो-रो जेटी सुरू करणे, सर्व्हिस रोड तसेच रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा, स्वच्छता व मूलभूत सुविधा सुधारण्याच्या मागण्याही मांडण्यात आल्या. एमआयडीसीतील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी देण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रश्नांवर लवकरच मंत्रालयात सर्व संबंधित विभागांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com