पंचतत्त्वांच्या संकल्पनेतून रघुनाथ विहारमध्ये गणेश दर्शन

पंचतत्त्वांच्या संकल्पनेतून रघुनाथ विहारमध्ये गणेश दर्शन
Published on

पंचतत्त्वांच्या संकल्पनेतून रघुनाथ विहारमध्ये गणेश दर्शन
खारघर, ता. १५ (बातमीदार) : खारघर येथील रघुनाथ विहार सोसायटीत यंदाची गणेश सजावट पंचतत्त्वांच्या संकल्पनेवर आधारित करण्यात आली आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्त्वांच्या माध्यमातून भगवान गणेशाचे दर्शन घडविण्याचा अनोखा प्रयत्न सोसायटीच्या वतीने करण्यात आला आहे.
सजावटीच्या सर्वांत वरच्या भागात आकाश तत्त्वाचे दर्शन घडते. आकाश हे विशालता आणि दैवीत्वाचे प्रतीक मानले आहे. त्यानंतर भगवान शिवाची मूर्ती अग्नी तत्त्वाचे प्रतीक म्हणून साकारण्यात आली असून, अग्नी जीवनातील ऊर्जा व पचनशक्तीचे प्रतीक आहे. माता पार्वतीची मूर्ती जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. जल हे जीवनातील प्रवाहीपणा आणि भावनांचे प्रतीक मानले जाते.
यानंतर वायू तत्त्वाचा अनुभव घेत भाविक गणेशमूर्तीसमोर पोहोचतात. शेवटी पृथ्वी तत्त्वाच्या माध्यमातून स्थिरता आणि दृढतेचा संदेश देण्यात आला आहे. भगवान गणेश हे मूलाधार चक्राचे अधिष्ठाता दैवत मानले जात असल्याने पंचतत्त्वांची ही संकल्पना गणेश दर्शनाशी जोडण्यात आली आहे.
या सजावटीतून भाविकांनी पंचतत्त्वांचे चिंतन करून गणेश चरणी स्वतःला समर्पित करावे आणि आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घ्यावा, असा संदेश देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com