घरगुती गणेशोत्सवाच्या परंपरांचे होणार डिजिटल जतन

घरगुती गणेशोत्सवाच्या परंपरांचे होणार डिजिटल जतन
Published on

उल्हासनगर, ता. १६ (बातमीदार) : घराघरांतील गणेशोत्सवाच्या परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि आठवणी जतन करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने ‘घरोघरी बाप्पा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात नागरिकांनी आपल्या घरातील गणपतीची सजावट, पूजापद्धती, कौटुंबिक परंपरा आणि गणेशोत्सवाशी संबंधित आठवणींची नोंद संकेतस्थळावर करावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरच्या गणपतीच्या छायाचित्रासह गणेशोत्सवाची कथा संकेतस्थळावर नोंदविता येणार आहे. अनेक वर्षांपासून जपलेल्या कौटुंबिक परंपरा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, आगळ्या सजावटी तसेच घरातील विशेष प्रथा यांची माहिती या माध्यमातून संकलित केली जाणार आहे. त्यातून शहराचा सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘डिजिटल सांस्कृतिक संवर्धक’ हे सन्मानपत्र देण्यात येणार आहे. हा उपक्रम स्पर्धेपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या सहभागातून उल्हासनगरचा सांस्कृतिक इतिहास जतन करण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी आणि सहभाग नोंदविण्यासाठी ९१३६१ ७२६८१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक, युवक, महिला मंडळे आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे महापालिकेने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com