शेतकरी, सहकारहिताचे प्रश्न बँकेच्या सभेत

शेतकरी, सहकारहिताचे प्रश्न बँकेच्या सभेत
Published on

मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुरबाड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते धनाजी दळवी यांनी शेतकरी, सहकारी संस्था, कर्मचारी, तरुण व विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध प्रश्न मांडले. बँकेच्या नफ्यातील घट, धान विक्रीची रक्कम रखडल्याने पीककर्जदार शेतकरी थकबाकीदार होण्याचा प्रश्न, मृत कर्जदारांच्या कुटुंबीयांना सवलत, विमा संरक्षण आणि सामाजिक उपक्रम याबाबत त्यांनी सूचना केल्या.

बँकेच्या नफ्यात झालेल्या घटेची कारणमीमांसा करून भविष्यात नफा वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दळवी यांनी केली. नफ्यातून योग्य तरतूद करून सहकारी संस्था आणि तरुणांच्या सहकारविषयक उपक्रमांना आर्थिक हातभार देता येईल का, याचाही विचार करण्याची सूचना त्यांनी केली. सरकारच्या एकाधिकार धान खरेदी योजनेत धान विकणाऱ्या पीककर्जदार शेतकऱ्यांना वेळेत पैसे न मिळाल्याने ते थकबाकीदार ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्याने धान विकल्याची अधिकृत पावती बँकेकडे साद केल्यास त्याची विक्रीची रक्कम विचारात घेऊन ३१ मार्चपूर्वी पीककर्ज नियमित करण्याची व्यवहार्य पद्धत अवलंबावी, अशी मागणी दळवी यांनी केली.
कर्जदार सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूतीची भूमिका घेत, नियमांच्या चौकटीत व्याजमाफी अथवा मुद्दलात सवलत देता येते का, याचा विचार करण्याची सूचनाही त्यांनी केली.

कर्मचारी, सभासदांच्या विम्याचा मुद्दा
बँकेतील कर्मचारी आणि सभासदांसाठी व्यापक विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच अधिकाधिक पगारदार खाती बँकेत आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली. सेवा सहकारी संस्थांच्या सचिवांना त्यांच्या योगदानानुसार योग्य स्थान देण्याबाबतही विचार करण्याची सूचना त्यांनी केली. सुरक्षा कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार योग्य मोबदला मिळावा, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com