

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर शहरातील आदर्श विद्या मंदिरच्या प्राथमिक विभागातील शिक्षिका ज्योती केणेकर यांनी ३३ वर्षांच्या अध्यापन सेवेनंतर ३१ ऑगस्टला स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत शिस्त, संस्कार आणि जीवनमूल्यांची शिकवण देणाऱ्या केणेकर यांच्या कार्याची आठवण ठेवत माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने दुर्गम भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदत करण्याचा संकल्प केला.
केणेकर यांनी जुलै १९९३ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अध्यापन केले. विद्यार्थ्यांमध्ये समरसून शिकविण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्यांचे विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी २९ ऑगस्टला म्हाडा कॉलनीतील विमल मल्टीपर्पज हॉलमध्ये निरोप समारंभ झाला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी बाईंनी लावलेली शिस्त, दिलेले संस्कार आणि शिकविलेले धडे आजही स्मरणात असल्याचे सांगितले. परदेशात तसेच परप्रांतात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी ध्वनिचित्रफिती, ध्वनिमुद्रण आणि लिखित संदेशांद्वारे कृतज्ञता व्यक्त केली.
केणेकर यांचे बालपणही खान्देशातील दुर्गम गावातील एकशिक्षकी शाळेत गेले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याची त्यांची इच्छा काही कारणांमुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यांची ही इच्छा लक्षात घेत माजी विद्यार्थ्यांनी दुर्गम भागातील वंचित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मदतीचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमात केणेकरही सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.