मनाई असतानाही झाडांवर रोषणाई

मनाई असतानाही झाडांवर रोषणाई
Published on

मनाई असतानाही झाडांवर रोषणाई
गणेशोत्सव मंडळांकडून दिव्यांची सजावट
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने झाडांवर विद्युत रोषणाई करण्यास मनाई केलेली असतानाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची सजावट केली आहे. सीबीडी, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली आणि दिघा या विभागांत ही रोषणाई करण्यात आली असून, गणेशोत्सव सुरू होऊनही संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नाही.
झाडांवर केलेली विद्युत रोषणाई प्रकाश प्रदूषणास कारणीभूत ठरत असून, पक्षी तसेच झाडांवरील कीटकांसाठी ती धोकादायक असल्याचा पर्यावरणतज्ज्ञांचा दावा आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली होती. यापूर्वी नवी मुंबईतील उपाहारगृहे आणि व्यावसायिकांकडून झाडांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व जाहिरातींची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात झाडांवर विद्युत रोषणाई केली जात असल्याने महापालिका प्रशासनाने यंदा उत्सवापूर्वीच सर्व संबंधित वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही अनेक गणेशोत्सव मंडळांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कारवाईचे आदेश
झाडांवर विद्युत रोषणाई करण्यास मनाई असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांनी दिली. त्यामुळे आता संबंधित गणेशोत्सव मंडळांवर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com