ठाणे ग्रामीण पोलिसच असुरक्षित

ठाणे ग्रामीण पोलिसच असुरक्षित
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : पोलिस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उर्जिता हॉटेलसमोरील रस्त्यावर पार्क केलेल्या ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तीन बसमधून बॅटरी आणि बॅटरी केबल असा सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांच्या वाहनांमधून चोरी होत असल्याने सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिस हवालदार चेतन अशोक पाटील (वय ४४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मोटार परिवहन शाखेच्या एमएच १२ एक्सएच १२८६, एमएच १२ झेडसी ३०४१ आणि एमएच १२ व्हीव्ही ८१९६ या क्रमांकाच्या तीन बस उर्जिता हॉटेलसमोरील कळव्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पार्क करण्यात आल्या होत्या. चेतन पाटील हे सोमवारी (ता. १४) सकाळी कर्तव्यावर आले. त्यांनी एमएच १२ एक्सएच १२८६ बस दैनंदिन कामासाठी ताब्यात घेतली असता तिची बॅटरी आणि बॅटरी केबल गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अन्य दोन बस तपासल्या असता त्यांच्या बॅटरी केबलही चोरीला गेल्याचे समोर आले. चोरट्याने बसमधील बॅटरी व केबल चोरल्याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com